⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | कृषी | Rain News : शेतकऱ्यांनो सावधान जिल्ह्यात येत्या २ दिवसात पावसाची शक्यता

Rain News : शेतकऱ्यांनो सावधान जिल्ह्यात येत्या २ दिवसात पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | Rain News | गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात उन्हाचा प्रकोप सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याचे तापमान हे ४७ डिग्री अंशा पर्यंत पोहोचले होते. मात्र गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात आभालमय (ढगाळ) वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसात म्हणजे १४ आणि १५ तारखेला जिल्ह्यात पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. मात्र येत्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. गुरुवारी दुपारपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर आभाळाची चादर पसरली आहे. यामुळे वातावरणात उष्णता कमी झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये काही अंशी पाऊस शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

तर दुसरीकडे हवामान तज्ञ निलेश गोरे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना माहिती दिली की, जळगाव जिल्ह्यात पाऊस पडेल अशी शक्यता जरी असली तरी देखील हा पाऊस फारच थोड्या प्रमाणावर पडणार आहे. पावसाच्या काही सरी पडतील असा माझा अंदाज आहे. या पावसाला पाऊस म्हणता येणार नाही कारण पावसाचे काही शिंतोडे जळगाव जिल्ह्यातल्या काही ठिकाणी पडू शकतात. १४- १५ तारखेपर्यंत जळगाव जिल्ह्यात असेच आभाळाचे वातावरण असणार आहे. यामुळे नागरिकांना उष्णता जाणवणार नाही मात्र 15 तारखेनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निघणार असून उष्णतेला सुरुवात होणार आहे.

पावसाची दक्षता म्हणून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी स्वतःच्या शेतीकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे.अशा वेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतमालाचे संरक्षण करणे देखील गरजेचे आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह