⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

धनादेश निर्दोष प्रकरणी ‘त्या’ व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । धरणगाव न्यायालयात प्रलंबित धनादेश अनादर फौजदारी खटल्याप्रकरणी रावेर येथील बांधकाम व्यवसायिक सचिन श्रीराम जाधव यांची ९मे रोजी निर्दोष मुक्तता करण्याचा न्यायालयाचा निर्णय देण्यात आला.

धरणगाव येथील बांधकाम ठेकेदार व शेत मिळकत विकत घेऊन त्यावर प्लॉट पाडून विक्रीचा व्यवसाय करणारे सुनील मधुकर चौधरी यांनी त्यांचे रावेर स्थित शालक चंद्रकांत पांडुरंग चौधरी यांच्या परिचयातून रसलपुर तालुका रावेर येथील बांधकाम ठेकेदार सचिन श्रीराम जाधव यांना १५ लाख ८५,००० हजार ची रक्कम उसनवार दिली होती. अखेरीस काही रकमेचा परतावा केल्यानंतर उर्वरित रक्कम ४ लाख ९५,००० हजारसाठी सचिन श्रीराम जाधव यांनी भारतीय स्टेट बँक शाखा रावेर चा धनादेश दिला होता. सदरील धनादेश सुनील मधुकर चौधरी यांनी दोन वेळा रोखीकरण हा करता टाकला असता. खात्यात रक्कम शिल्लक नसल्यामुळे अनादरी झाल्याने त्यांनी २ नोव्हेंबर २०१८ रोजी परिसर वकिलामार्फत नोटीस दिली होती. नोटीस मिळाल्यावर ही रक्कम मिळाली नसल्याने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट एक्ट १३८ प्रमाणे फौजदारी खटला ५६८/२०१८ दाखल करण्यात आला होता.

सुनील चौधरी यांचा केवळ पुरावा नोंद घेण्यात आला. खटल्या कामी धरणगाव न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस डी सावरकर यांनी आरोपी सचिन श्रीराम जाधव यांची ०९मे रोजी निर्दोष मुक्त करण्यात आल्याचा न्याय निर्णय दिला आहे. आपल्या कामी आरोपी सचिन जाधव यांच्यातर्फे ऍड.मोहन बी शुकला यांनी कामकाज पाहिले त्यांना ऍड. सुजित पाठक यांनी सहकार्य केले.