कच्च्या तेलाचे दर पुन्हा महागले, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

मे 7, 2022 10:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्यानने कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. मात्र दुसरीकडे भारतात कच्च्या तेलाचे दर वाढून देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जाहीर झालेल्या दरानुसार जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे.

petrol diesel 1 jpg webp

गेल्या महिनाभरापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची दर वाढ ही सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. सहा एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांची वाढ झाली होती.राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर मोठ्या शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

मार्च २०२२ महिन्यामध्ये जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now