प्राजक्ता माळीने केला भोंग्यांना विरोध : संतप्त नेटकरी करतायेत कारवाईची मागणी

prajakta mali contravercy jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ मे २०२२ | महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतच्या सूत्रसंचालनातून संपूर्ण मराठी माणसाच्या मनामनात पोचलेली सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी आता एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पहाटे आपल्या इंस्टाग्राम पेज वर तिने मशिदी वरच्या भोंग्यांविरुद्ध पोस्ट केली. त्यामुळे आता तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त नेटकरी करत आहेत.

आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भोंगे बंद व्हावेत यासाठी आंदोलन सुरू आहे. याच्या पडासाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे. आता प्राजक्ता माळी देखील या वादात उतरली होती. पहाटे तिने भोंगे बंद करा या संदर्भात इंस्टाग्राम वर पोस्ट केली होती. मात्र नेटकाऱ्यांनी टीका होताच तिने ही पोस्ट डिलीट केली.

सिनेअभिनेत्री म्हटलं तर सामाजिक क्षेत्रात त्यांना जपून पाऊल टाकावं लागतं उत्साहाच्या भरात कधीकधी घेतलेले काही निर्णय त्यांना पुन्हा मागे घ्यावे लागतात त्यातलाच हा निर्णय. नेटकरांच्या विरोधानंतर अखिरे ही पोस्ट डिलीट केली आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now