जळगाव लाईव्ह न्युज | ४ मे २०२२ | आदित्य ठाकरे यांच्यासारखे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी यांनी ना संघर्ष केला ना संघर्ष पाहिला यामुळे ते कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडूउ शकतात अशा शब्दात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
काही दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले होते की मी आयोध्या साठी कार सेवा केली आहे यावेळी त्यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले होते की फडणवीस हे १८५७ च्या लढ्यात सुद्धा होते.
बाबरी मशीद पाडली जात असताना मी तिथे उपस्थित होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. युवासेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. फडणवीस तर १८५७ च्या उठावातही असतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.
आदित्य यांनी केलेल्या या टीकेचा आता देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सडीज बेबींनी ना संघर्ष केला आहे, ना संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात,’ असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.