⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राजकारण | Viral Video : भाजपकडून ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नाईट क्लबमध्ये तरुणीसह दिसले राहुल गांधी

Viral Video : भाजपकडून ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नाईट क्लबमध्ये तरुणीसह दिसले राहुल गांधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । भाजप नेत्यांकडून सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल केला जात असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील तो व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका होतं आहे. सोशल मीडिया युजर्समध्ये या व्हिडिओनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. तर दुसरीकडे खासगी आयुष्यात इतरांनी दखल देण्याचे कारण काय असा सवालही युजर्सकडून उपस्थित करण्यात येत आहे.

भाजपचे जेष्ठ पदाधिकारी अमीत मालवीय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे एका नाईट क्लबमध्ये एका तरुणीसोबत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या एका मैत्रिणीच्या विवाह सोहळ्या निमित्त नेपाळच्या राजधानीत काठमांडूमध्ये असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी नेपाळमध्ये आले असल्याचे वृत्त देखील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसापासून सक्रिय राजकारणापासून लांब असल्याचे पाहावयास मिळत आहे.

राहुल गांधी यांची मैत्रिण सुमनिमा उदास ही एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत पत्रकार म्हणून कार्यरत होती. सुमानिमाच्या वडिलांनी नेपाळचे राजदूत म्हणून म्यानमारमध्ये जबाबदारी पार पाडली. राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती या विवाह सोहळ्यात दाखल होणार आहेत. राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपशी संबंधित राजकीय नेते, उजव्या विचारसरणीला पाठिंबा असणाऱ्या युजर्सकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, ही महिला राहुल गांधी यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिण असल्याचे दावा एका फोटोच्या आधारे केला आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.