जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी आज रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Rate) दर जाहीर केले. गेल्या अनेक दिवसांप्रमाणे आजही जनतेला दिलासा मिळाला आहे. आज सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भावात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
गेल्या महिन्याच्या अखेरीपासून या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 10 रुपयांची वाढ केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही वाढ झाली नाही.
नव्या दरानुसार आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे. आज शनिवारी कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली. क्रूड प्रति बॅरल $ 104.90 आणि ब्रेंट क्रूड $ 107.5 प्रति डॉलरवर पोहोचले. 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांची वाढ झाली होती.
इतर मोठ्या शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.
गेल्या मार्च महिन्यामध्ये जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.