⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | स्वप्नील बाविस्करांचा साहित्य भूषण पुरस्काराने गौरव

स्वप्नील बाविस्करांचा साहित्य भूषण पुरस्काराने गौरव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । मुंबईतील कलासाधना साहित्य संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षी नांद्रा येथील कवी, लेखक स्वप्निल बाविस्कर यांना त्यांच्या अप्रकाशित काव्यसंग्रह शेतकरी मायबाप आणि साहित्य क्षेत्रातील प्रभावी लेखनशैलीबद्दल नुकताच (नवी मुंबई) झी मीडियाचे वृत्तनिवेदीका अनुपमा खानविलकर यांच्या हस्ते साहित्य भूषण पुरस्कार, सन्मानपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

शेतकरी कवी म्हणून अनुपमा खानविलकर यांनी विशेष संवाद साधला. या कार्यक्रम प्रसंगी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चोतमल व पोलिस निरीक्षक रत्ना खंडेलवाल, सिने अभिनेत्री संजना व नगरसेविका नेत्रा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी कला साधना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मेघा महाजन व श्रीराम महाजन यांनी यशस्वी आयोजन केले. या पुरस्कारासाठी कवी स्वप्नील बाविस्कर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कवी स्वप्नील बाविस्कर यांना या अगोदरही महाराष्ट्रभरातून विविध प्रकारचे साहित्य व काव्य संदर्भात पुरस्कार मिळाले आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह