भाच्यासोबत मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्या मामीवर काळाचा घाला

एप्रिल 28, 2022 3:01 PM

दुचाकीला ट्रकची धडक, महिला ठार, एक जखमी


जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । येथील द्वारका नगराजवळ राष्ट्रीय महामार्गावरून गुरूवारी दि २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता दुचाकीला मागून येणारा ट्रक (एमएच २९ एम ०१४४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडताच त्यांच्या अंगावरून मागून येणारा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली.

अपघात jpg webp

मयत महिला हि भाच्यासोबत दुचाकीने मुलगी पाहण्यासाठी जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र रस्त्यात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. ट्रकखाली सापडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. कविता मुकेश कोळी (वय-३०) रा. रेभूटा ता. रावेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून अजय कमलाकर सोनवणे हा तरूण जखमी झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील रेभूटा येथे राहणाऱ्या कविता मुकेश कोळी (वय-३०) या पती व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. गावातच त्यांचा भाचा अजय कमलाकर सोनवणे हा देखील वास्तव्यास आहे. त्यांच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी अजय आणि त्याची मामी कवीता कोळी या एकाच दुचाकीवरून धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे जाण्यासाठी निघाले होते. जळगाव शहराच्या पुढे द्वारका नगराजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना मागून येणारा ट्रक (एमएच २९ एम ०१४४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कविता कोळी ह्या रस्त्यावर पडताच त्यांच्या अंगावरून मागून येणारा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय सोनवणे हा जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी, बापू कोळी, प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमीस तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. तर मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती. जळगाव तालुका पोलीसांनि ट्रक ताब्यात घेतला असून दुपारी उशिरापर्यँत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now