⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | गुन्हे | पापड, कुरडया, गव्हले विक्रीपूर्वीच जळगावच्या तिघांवर काळाची झडप

पापड, कुरडया, गव्हले विक्रीपूर्वीच जळगावच्या तिघांवर काळाची झडप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । पापड, कुरडया,गव्हले विक्रीसाठी जालना येथे जात असताना ट्रक व पिकअप गाडीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणाचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले. हा अपघात सकाळी ७ वाजता बाणेगाव (पाटी) येथे झाला. अपघातातील मयत तिघे हे जळगाव जिल्ह्यातील होते.

अधिक माहिती अशी की, एरंडोल येथून मंगळवारी मध्यरात्री पापड, कुरडया,गव्हले विक्रीसाठी ५ जण जालना येथे जाण्यास निघाले.रात्री उशिर झाल्याने भोकरदन नजिक रिकाम्या जागेत पिकअप गाडी उभी करून मुक्कामास थांबले. सिल्लोड येथे त्यांनी भल्या पहाटे चहा घेतला.सकाळी जालन्याकडे जाण्यासाठी निघाले असता ७ वाजेच्या सुमारास बाणेगाव (पाटी) जवळ समोरून येणारा ( एम.एच.४० ए.के. ५१५६) या क्रमांकाचा ट्रक व ( एम.एच.१९ सी.वाय.१०९१) या क्रं पिकअपचा जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला.

अपघातात कल्पनाबाई भरत पाटील वय ४७ वर्षे रा.अमळनेर दरवाजा एरंडोल, रामदास रामरतन पाटील वय४० वर्षे रा. बोरगाव ता. धरणगाव हे दोघे सासू-जावई जागीच ठार झाले तर कल्पना गोविंद ठाकूर वय४५ वर्षे रा.अमळनेर दरवाजा एरंडोल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन सुकलाल पाटील वय ४० वर्षे व भारत पाटील वय ५५ रा. अमळनेर दरवाजा परीसर हे दोघे जखमी झाले. या घटनेने एरंडोल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह