२० वर्षीय तरुणी बेपत्ता, पोलिसांत नोंद

एप्रिल 27, 2022 4:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील चिंचोली येथून २० वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची घटना घडली. याबाबत येथील पोलिसांत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हरविल्याची नोंद झाली.

missing

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चिंचोली येथे विटा थापण्याच्या कामाकरीता वाघझिरा येथील देवराम गुमान पावरा हे आपल्या कुटुंबियासह चिंचोली गावातील सार्वजनिक विद्यालयाजवळ वास्तव्याला आहे. रविवारी देवराम पावरा यांची मुलगी अनिता देवराम पावरा (वय २०) ही २५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काहीही न सांगता निघून गेली. रात्री उशीरा पर्यंत न आल्याने परिसरात तिचा शोध केली परंतू कुठेही मिळून न आल्यामुळे मंगळवारी २६ एप्रिल रोजी देवराम पावरा यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसांत हरविल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सपोनि अजिज शेख, पोहेकॉ नरेंद्र बागुले, श्याम पवार करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now