⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने व युवासेना सचिव दुर्गाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान २०२२ वीर सावरकर सभागृह, इंद्रप्रस्थनगर येथे रविवारी शिवसैनिक महेश ठाकूर यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. युवासेनेतर्फे इंद्रप्रस्थ नगरात दि २४ रोजी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान घेतले. नोंदणीसाठी युवकांचा मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

उद्घाटन व युवासेना सदस्य कार्ड वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. युवासेना तरुणांना स्वाभिमानाने जगणे शिकवते. विविध समाजकार्य करण्यासाठी युवासेना अग्रेसर आहे. युवकांनी युवासेनेत सहभागी व्हावे असेही यावेळी विष्णू भंगाळे यांनी सांगितले. युवासेना उपजिल्हा अधिकारी पीयूष गांधी, महानगर समन्वयक नीलेश सपकाळे, उपमहानगर अधिकारी जय मेहता, विभाग अधिकारी अमोल मोरे, शिवसैनिक अॅड. अभिजित रंधे, शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज पोकळे, पृथ्वी देशमुख, लोकेश चौधरी आदी उपस्थित होते. सारंग चौधरी, राकेश थोरात, राहुल नागला, केतन जाधव, हर्षल तुळसकर, प्रशांत नेरकर, गौरव ठाकूर, रोशन पाटील, केतन पाटील, श्याम जाधव, ललित चौधरी यांचे सहकार्य लाभले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.