जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील सावखेडा येथील राहुल रमेश पाटील या तरुणाने स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
जखमी राहुल याला कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. सुदैवाने यात त्याचा जीव वाचला. राहुलवर उपचार सुरू आहेत. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.