जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील मोहराळे येथील माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेचा माहेरहून दाेन लाख रुपये आणावे यासाठी पतीसह कुटुंबातील सदस्य, नातलगांनी छळ केल्या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, निकिता लोंढे हीने रविवारी फिर्याद दिली. तिचे लग्न विशाल लोंढे, रा.हिंगोणा याच्यासोबत ७ फेब्रुवारी २०२१ रोजी झाले. काही दिवसांनंतर पतीसोबत वाद होवू लागले. ताे शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. पती विशाल हा इंदापूर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीस असून तेथे घर व मोटारसायकल घेण्यासाठी त्याने माहेरहून दोन लाख रुपये आणण्यास सांगितले. त्यापैकी एक लाख रुपये दिले. पुन्हा दोन लाख रुपयांसाठी पती विशालसह तिचे सासरे चंद्रकांत कौतिक लोंढे, सासू अंजली लोंढे, सुभाष लोंढे, लीलाबाई लोंढे, सर्व रा.हिंगोणा माम सासरे मधुकर गजरे, रा.यावल, नणंदोई योगेश तायडे, वैशाली तायडे, दोन्ही रा.भुसावळ यांनी संगनमत करून निकिताचा छळ केला. या प्रकरणी येथील पोलिसांत वरील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.