४२ वर्षीय इसमाची शेतात गळफास घेत आत्महत्या

एप्रिल 25, 2022 9:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील रहिवासी एका ४२ वर्षीय इसमाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुभाष चावदस लासुरे (धनगर) असे मृताचे नाव आहे.

suicide 2 jpg webp

अधिक माहिती अशी की, लासुरे हे रविवारी सकाळी शेतात जात असल्याचे सांगून घरून निघाले होते. गावालगतच असलेल्या त्यांच्या शेतामध्ये निंबाच्या झाडाला बागाइतदार रुमालाच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतमजुरांच्या निदर्शनास आला. त्यांनी गावात व यावल पोलिसांना माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now