रिक्षाच्या धडकेने पादचारी महिला जखमी; गुन्हा नोंद

एप्रिल 25, 2022 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील डांभुर्णी-किनगाव रस्त्यावर भाजीपाला घेवून पादचारी महिलेला ऑटो रिक्षाने धडक दिली. या अपघातात ही ५४ वर्षीय महिला जखमी झाली असून बुधवारी घडलेल्या या अपघाताबाबत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

aaccident

आधीडांभुर्णी येथील रहिवासी प्रमिला माधव कोळी या बुधवारी सायंकाळी पायी चालून भाजीपाला विक्री करत असताना डांभुर्णी-किनगाव रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या ऑटो रिक्षा (क्रमांक एमएच १० सीडब्ल्यू २३७९)ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या फेकल्या जावून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी त्यांच्या फिर्यादीवरून ऑटो रिक्षाच्या अज्ञात चालकाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now