सिनेटच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता

एप्रिल 24, 2022 10:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्व विद्यार्थी संघटना सक्रिय असून, नवीन पॅनलही उभारण्याची शक्यता आहे.

sinet nivdnuka

विद्यापीठाच्या कायद्यात बदल झाल्यानंतर दुसऱ्यांदा विद्यापीठात नवीन बदलासह निवडणूक होणार आहे. त्यामुळे जळगाव विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात सभासद नोंदणी जोरात चालू आहे. परिसरात सर्व राजकीय चर्चेला रंग आला आहे. १५ मे पर्यंत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता विद्यापीठाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now