जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । अडावद येथे पाणीटंचाई व अस्वच्छ पाणी पुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. सरपंच व ग्रामसेवक नसल्यामुळे संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
प्रभाग दोनमधील पाणीटंचाई तातडीने दूर करा, अशी मागणी सातत्याने केली जात असली तरी देखील सरपंच, ग्रामसेवक दुर्लक्ष करत आहेत. तर प्रभाग दोनमध्ये पाणीपुरवठा अभावी महिलांची परवड सुरू आहे. परंतु, दुरुस्तीसाठी मनुष्यबळ नसल्याची कारणे सांगितली जातात. सरपंचांकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी डॉ. अरूण कोठारी, सुनील सारस्वत, वसंत वाणी, शंकर नेवे, नामदेव गेही, पंकज शिंपी, डिंगबर जोशी, उमेश नेवे, किरण खैरनार, भारती शिंपी, शोभा गुरव, शरद सोनार, राजेश कासार, डॉ. व्हि. व्ही. बाहेती, डॉ. प्रफुल्ल देशमुख, भालचंद्र नेवे, लखिचंद पाटील, प्रभाकर कासार आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.