४९ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 23, 2022 2:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । यावल शहरातील शिवाजी नगर भागातील एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे निदर्शनास आली. या प्रकरणी येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

crime

ज्ञानेश्वर अर्जुन कोल्हे (वय ४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी कोल्हे हे घरात एकटे होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी घराच्या लाकडाच्या दांड्याला साडी बांधून गळफास घेतला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. याबाबत काेल्हे यांचा भाचा भूषण सूर्यवंशी यांच्या खबरीवरून येथील पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now