जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील एका ७५ वर्षीय महिला घरात खाटेवर झोपलेली असताना अंगावर पांघरलेल्या चादरीने पेट घेतला होता. १० मार्च रोजी घडलेल्या या घटनेत महिलेचे दोन्ही पाय भाजले होते. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचे निधन झाले.

जानकाबाई हरचंद पाटील असे या महिलेचे नाव आहे. त्या झाेपल्या असताना खाटेजवळील शेकोटीमुळे त्यांच्या चादरीने पेट घेतला. या घटनेत त्यांचे दोन्ही पाय भाजले होते. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये दाखल केले होते. या प्रकरणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.नीता भोळे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसांत शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.













