अश्लिल व्हिडीओ रेकॉर्डकरून वृद्धाची १० हजारात फसवणूक

एप्रिल 20, 2022 2:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । सोशल मीडियात अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देत एका ५७ वर्षीय वृद्धाकडून महिलेने १० हजार रुपये घेत फसवणूक केल्याची घटना भुसावळ येथे घडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

sextortion jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ येथील एका वृद्धास व्हॉटसॲपवर कॉल करून अज्ञात महिलेनं वृध्दास अश्लिल व्हिडीओ तयार करण्यास सांगत तो व्हिडिओ रेकॉर्ड करीत व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. दि १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून एका महिलेचा व्हॉटसॲपवर Hi असा मॅसेज आला त्यानंतर वृद्धाशी जवळीक साधून व्हॉटसॲपच्या व्हिडीओ कॉल करून महिलेने तिच्या अंगावरील कपडे काढून अश्लिल व्हिडीओ पाठविले. तसेच ‘आप भी अपने कपडे उतारकर दिखाओ’ असे सांगत महिलेने लागलीच वृद्धाचे कपडे काढलेला व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार ५८० रूपयांची खंडणी वृद्धाकडे मागितली.

घाबरलेल्या वृद्धाने महिलेच्या खाते क्रमांकावर पैसे पाठविले. या नंतर घडलेला प्रकार पीडित वृद्धाने लागलीच जळगाव सायबर पोलीसात धाव घेवून सांगत तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारीवरून अज्ञात दोन मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now