जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । येथील शकुंतला जे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी जागृती विश्वनाथ भारुडे हिला नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातर्फे राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागृती हिला पाच हजाराचा धनादेश व प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, सचिव दीपक सराफ, मुख्याध्यापिका आर. एन. महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जागृती हिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













