बातम्या
आकाशवाणी सर्कलवर एकाच दिवसात अनेक अपघात
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । शहरातील आकाशवाणी सर्कलवर पहाटे एक मालवाहू वाहन चढल्याचा प्रकार ताजा असतानाच आणखी एक अपघात घडला आहे. किशोर पाटील (डी.जे.शिवा) हे सर्कलवर लाईव्ह करत असताना हा प्रकार घडला असून सर्व लाईव्हमध्ये कैद झाले आहे. शहरातील सर्कलविषयी राजकारणी आणि सुज्ञ जळगावकर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.