बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगावचा संघ जाहीर

एप्रिल 19, 2022 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ | महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे १८ ते २१ एप्रिलदरम्यान लातूर येथे राज्य अजिंक्यपद यूथ मुलांच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगाव शहराचा संघ जाहीर करण्यात आला. या संघाचे प्रशिक्षक म्हणून निलेश बाविस्कर तर व्यवस्थापक म्हणून विशाल सोनवणे काम पाहत आहे.

boksing

राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी सिद्धांत अहिरे, वैभव नाईकडा, राकेश भोई, जय मराठे, तेजस कुमावत यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंचा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ. सचिन वाणी यांनी गौरव केला. तसेच वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now