धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

एप्रिल 18, 2022 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून लाऊडस्पीकरवरून (loudspeakers) राजकारण चांगलेच तापलेले दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ३ मे नंतर मशिदींतील लाऊडस्पीकर हटविण्याचा अल्टिमेटम दिला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि डीजीपी यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने आतापासून विनापरवाना लाऊडस्पीकर लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवेदन दिले आहे.

loudspeakers jpg webp

महाराष्ट्राच्या गृह विभागाचे निवेदन
३ मे नंतर मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावायचे असल्यास परवानगी घ्यावी लागेल, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल.

गृहमंत्र्यांची भेट घेणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील लवकरच यासंदर्भात महाराष्ट्राच्या डीजीपींसोबत बैठक घेणार आहेत. विनापरवाना लाऊडस्पीकर वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. या बैठकीनंतर विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.

शिक्षा किती आहे?

ज्या-ज्या ठिकाणी मशिदी आहेत, तिथे पाचवेळा अजान होतो. याच्या वेळा ठरलेल्या आहेत. अजानच्या वेळेपूर्वी पंधरा मिनिटे आणि त्या काळात मशिदीच्या शंभर मीटरच्या आत दुसऱ्यांना ध्वनिप्रदूषण करता येणार नाही. यातला कुठलाही नियम मोडला, तर 4 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यात दंड वेगळा असेल. तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तडीपारी होऊ शकते. 6 महिन्यांसाठी अटक होऊ शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now