घरफोडी करायच्या आत ‘त्याला’ पोलिसांनी केली अटक

एप्रिल 17, 2022 7:58 PM

घरफोडीच्या प्रयत्नात ‍फिरणार्‍या संशयिताला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका इसमाला पोलीसानी मध्यरात्री अटक केली आहे. जिल्हापेठ पोलिसांनी हि कामगिरी बजावली. धाकादाययक बाब म्हणजे त्याच्यावर राज्यासह मध्यप्रदेशात गुन्हे दाखल आहेत.

खून 1 jpg webp

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सलीम सुभान तडवी व होमगार्ड विनोद ठाकूर हे शनिवारी १६ एप्रिल रोजी रात्री अडीच वाजता गस्त घालीत होते. पेट्रोलिंगवर असतांना स्टेट बँक आँफ इंडीया शिवकॉलनी शाखेच्या बाजुला असलेल्या भगीरथ कॉलनीतील डॉ. पी.डी. पाटील यांच्या घरासमोर एक इसम संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव रुपसिंग नजरू भिल्ल (वय ५० रा.गर्दावाद ता. कोकशी जि. धार मध्य प्रदेश) असे सांगून तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

या वस्तू सापडल्या

दरम्यान, सलीम तडवी यांना संशय आल्याने त्यांनी संशयिताची अंगझडती घेतली.त्याच्याकडे १ फुट लांबीची टॉमी, मोठा स्क्रू ड्रायव्हर, एक पोपट पान्हा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now