बातम्या

महिलांना बचतगट, कुटूंब, आरोग्य, जिद्द, परिश्रमबाबत मार्गदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । महिलांनी आपले कुटूंब, आरोग्य सांभाळून जिद्द, चिकाटी, परिश्रमाने बचतगट माध्यमातून समाजाभिमूख अनेकोत्तम उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोदावरी अर्बन बँकेच्या (मल्टीस्टेट) अध्यक्षा राजश्री पाटील यांनी एरंडोलला महिलांना मार्गदर्शन करतांना केले. 

सरस्वती कॉलनीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात राजश्रीताई बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका शशिकला जगताप होत्या तर राजश्रीताई, विजया बोरसे, वैष्णवी पाटील, प्रमुख अतिथी होत्या. राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत, परिचय करून एरंडोल शहरातील महिला मंडळांचे विविध उपक्रमांची माहिती सांगितली.  आपल्या ओजस्वी भाषणात राजश्री त्यांचा जीवनपटच उलगडून दाखविला. बालकलाकार, अभ्यासातील हुषारी, खेळाडूवृत्ती, उत्कृष्ट भाषण कौशल्य, महिला संघटना, आकाशवाणी कार्यक्रमांमधून व्यक्तीमत्व घडविले.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर साहेबांची मानसकन्या, विदर्भरत्न म्हणून ओळख तर आहेच परंतू हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची पत्नी म्हणून विशेष ओळख आहे.  शिवविचारांनी प्रेरित होवून राज्यात अनेक भागात महिलांना मार्गदर्शनासाठी बचत गटांच्या माध्यमातून स्त्रीला स्वत:च्या पायावर उभी करण्यासाठी सतत झटणार्‍या राजश्री 47 हजार बचतगटांची स्थापना करून एक लाख 50 हजार महिलांना रोजगार मिळवून दिला.

कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनाने करण्यात आली. मनिषा पाटील यांनी सूत्रसंचलन तर आभार प्रदर्शन वंदना पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी इंदिरा पाटील, डॉ. मीना काळे, सपना वानखेडे, प्रणाली भोसले, मीना वसईकर, शोभा कदम, शकुंतला पाटील, अनिता चव्हाण, कल्पना चौधरी, लता पाटील, शोभा पाटील, अन्नपूर्णा पाटील, सुरेखा पाटील, रत्ना चौधरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी लता मराठे, सुनंदा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button