⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

दिपक पाटील यांनी दिली अभ्यासासाठी पुस्तके भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । पहूर येथील गजानन क्रीडा संकुल येथे  स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थी साठी पहूर येथील मुळ रहिवासी व सध्या पुणे येथे जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिपक पंढरीनाथ पाटील यांनी  पुस्तके भेट देऊन  गावाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  पहुर येथील सध्या पुणे येथे कार्यरत  सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी – पुणे  श्री दीपक पंढरीनाथ पाटील यांचे संस्थेच्या वतीने चेअरमन श्री भास्कर शंकर पाटील यांनी  विशेष आभार मानले .
            अलीकडच्या काळात ना .अजित पवार यांनी पोलिसांची  ७००० पदे  भरली जाणार आहे असे जाहीर केले त्या अनुषंगाने गावातील जास्तीत जास्त मुले पोलिस भरतीमध्ये यशस्वी व्हावे व गावचे नाव व लौकिक वाढवा म्हणून श्री दीपक पंढरीनाथ पाटील यांनी संस्थेला पुस्तके देऊन तरुणांना पोलीस भरती साठी प्रोत्साहन दिले .      तरुणांना  स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती साठी अजून ही काही अडचणी असल्यास त्या सोडवण्याचे आश्वासन  दिपक पाटील यांनी दिले.          तरुणांनी त्यांचे आभार मानले व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.