अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

एप्रिल 17, 2022 3:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । नशीराबाद – जळगाव रोडवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचे अंदाजे ३५ ते ३८ वर्ष असे असून त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

crime

अधिक माहिती अशी की, नशीराबाद जळगाव रोडवर शिवशक्ती कारबाजारसमोर रस्त्यालगत अनोळखी पुरूषाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती नशीराबाद पोलिसांना नागरिकांनी कळविली. त्यानुसार पोलिसांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. मयताचे अंदाजे ३५ ते ३८ वर्ष असे असून त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now