जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । आमदार सुरेश भाेळे यांच्यावतीने १० एप्रिल राेजी श्रीराम नवमीनिमित्त तसेच १४ एप्रिल राेजी भगवान महावीर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते.

या स्पर्धेला जळगाव जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने या स्पर्धेला मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांना स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ भगवान श्रीराम, भगवान महावीर व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेषभूषा किंवा वृत्तपत्रात दिलेले चित्र अथवा स्वत: काढलेले चित्र आकर्षक रंगात रंगवून ७५८८४२३५६० या व्हाॅट्सऑप क्रमांकावर पाठवता येणार आहे. ही स्पर्धा दाेन गटात घेण्यात आली आहे. प्रत्येक स्पर्धेच्या प्रथम दहा स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवता येणार आहे.









