बातम्या

आता प्रत्येक शेतकरी कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करू शकतो, कारण…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी कोंबड्या पालनाचा व्यवसाय सुरू करू शकतो. यासाठी सरकार कर्ज देणार आहे. यामुळे आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही. या पार्श्वभूमीवरच आपण कुक्कुट पालन योजनेबद्दल आपण पात्रता, उद्दिष्टे, अटी व शर्ती याविषयीची माहिती पाहूयात…

कुक्कुट पालन योजना भारतामध्ये नाबार्ड नॅशनल ‘बँक ऑफ ॲग्रीकल्चर रूरल डेव्हलपमेंट’ द्वारा समर्थित आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कुक्कुट पालनासाठी बढावा देत आहे. सरकारने यासाठी 1000 पेक्षा पोल्ट्री फार्म सुरू केले आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला या व्यवसायाची माहिती असणे गरजेचे आहे.

ही योजना सरकारचा मुख्य उद्देश असा की प्रत्येक शेतकऱ्याला आत्मनिर्भर करायचं आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला कोणतेही अडचण येणार नाही कारण सरकार आपल्याला योग्य रीतीने कर्ज देणार आहेत.

कुक्कुट पालन योजना उद्देश
महाराष्टातला कोणताही व्यक्ती व्यवसाय करून आर्थिक परिस्थिती चांगली करू शकेल.
बॅक तुम्हाला लोन देईल त्यामुळे तुमचा व्यवसाय सुरू होईल.
ज्या व्यक्तीकडे व्यवसाय सुरू करण्या इतका पैसा नाही तो ही या योजनमार्फत आपला व्यवसाय सुरू करू शकतो.

कुक्कुट पालन योजना पात्रता :
महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.
शेतकरी असला पाहिजे.
महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
महाराष्ट्राचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.
व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.
पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स

कुक्कुट पालन योजना अर्ज कुठे करायचा?
सहकारी बँक
क्षेत्रीय ग्रामीण बॅंक
वाणिज्य बॅंक
राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक
सर्व व्यवसायिक बॅंक

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Related Articles

Back to top button