जळगाव जिल्हा

शिक्षणाचे टॉनिक घेतल्याशिवाय भविष्यात जगता येणार नाही – भारत ससाणे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । सद्या प्रयोगाच्या नावाखाली जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करण्यात येत असल्याने बहुजन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे आणले जात आहेत.कितीही संकटे आली तरी बहुजन समाजाने शिक्षणाची कास सोडू नये.मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडायचा असतील तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समता निर्माण करण्यासाठी शिक्षण मोफत व सक्तीचे व्हायला हवे असे परखड मत संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त कानळदा रोड परिसरातिल ओम साई नगर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.भविष्यात जगायचे असेल तर शिक्षणाचे टॉनिक आवश्यक आहे असे सांगून त्यांनी देशाच्या एकतेसाठी संविधानाने सांगितलेल्या मार्गावर चालायला हवे असे विचार मांडले.


यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे मुकेश सावकारे, एजाज शेख,ऍड. सुवर्णा भारुडे,प्रा डॉ.मधुकर बेडीस,विजय सुरवाडे, मुकेश कुरील,श्री.जाधव यांनी ही आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला ज्येष्ठ विधितज्ञ लीलावती चौधरी,नीलेश बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्तविक ऍड.अभिजीत लोखंडे यांनी तर आभार सपकाळे गुरुजी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी रेखा सुरेश सोनवणे,सविता सोनवणे, लिना लोखंडे,सुरेखा सपकाळे, शोभा बनसोडे, सुरेखा सोनवणे,सुरेश सोनवणे,विजय बनसोडे,उमेश सोनवणे,विजय चौधरी,अर्जुन सोनवणे,संजू निकम,किरण बाविस्कर, सुकलाल कोळी यांच्यासह ओम साईनगर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button