शरद पवारांच्या स्वागतासाठी तब्बल तीन क्विंटल फुलांचा हार
जळगाव लाईव्ह न्युज | १५ एप्रिल २०२२ | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. शरद पवार यांचा हा पहिलाच जळगाव दौरा असल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय पवारांच्या होणाऱ्या स्वागतामध्ये येत आहे.
शरद पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तब्बल तीन क्विंटल फुल असलेला हार सजवून ठेवला आहे. क्रेनचा सहाय्याने हा हार शरद पवारांना घालण्यात येणार आहे. हार बनवण्यासाठी जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील “जय अंबे” फुल भंडार यांना विशेष ऑर्डर देण्यात आली होती. हा संपूर्ण हार केवळ एका दिवसात तयार झाला आहे. तब्बल तीन क्विंटल इतकी या हाराची वजन असल्यामुळे क्रेनच्या साह्याने हा हार पवारांना घालण्यात येणार आहे. याचबरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील देखील शरद पवार यांच्या सोबत असणार आहेत.