मोठी बातमी ! 35 अवैध दारू विक्रेते ताब्यात

एप्रिल 14, 2022 6:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. शहरासह उपविभागात पोलिस प्रशासनाने काटेकार बंदोस्त तैनात केला असून तब्ल 35 अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍या विक्रेत्यांना ताब्यात घेवून डीटेन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री मिरवणुका संपल्यानंतर संंधितांना पोलिस स्टेशनमधून मुक्त करण्यात आले. प्रथमच अशा पद्धत्तीने कारवाई झाल्याने अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. 

crime 6 jpg webp


रेकॉर्डवरील विक्रेत्यांवर कारवाईभुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते त्याचप्रमाणे भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील ज्या गावांमध्ये महामानवडॉ.ाबासाहे आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका आहेत त्या गावातील अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. दरम्यान,  पोलिसांचे पथक सातत्याने अवैध दारू विक्री करणार्‍यांवर लक्ष ठेवून होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now