जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । शेंदुर्णी येथील अल्पभूधारक असलेल्या शेतकरी रंजना गोकुळ सिंग परदेशी यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून यांची दोन मुलं हे त्यांची शेती बघत होते मात्र पारंपरिक शेती बघत असताना त्यांना फारसे उत्पादन मिळत नव्हते त्यामुळे त्यांनाही काही वेळेला मजुरी देखील करावी लागत होती मात्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्यांना पॉलीहाऊस मंजूर झाले आणि त्यांनी ते करून घेतले त्यात त्यांना पन्नास टक्के अनुदान देखील मिळाले मात्र हे करत असताना त्यांनी जिद्द बाळगून पुढील प्रगती सुरू ठेवली त्यांचा मुलगा बालाजी गोकुळ सिंग परदेशी त्यांचा भाऊ असे दोघे मिळून ते काम बघू लागले हे काम बघत असतांना त्यांना इतर क्षेत्रापेक्षा या अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये चांगले उत्पन्न येऊ लागले स्वतः मेहनत घेत असल्याने ते चांगले उत्पादन घेण्यात यशस्वी ठरले

पारंपारिक पध्दतीने कापुस लागवड करत होते . परंतु कापुस पिकास लागणारा खर्च वजा जाता उत्पन्न कमी येत होते . त्यामुळे त्यांनी सन २०१ ९ -२० मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पॉलीहाऊस उभारणी केली . सुरुवातीला पॉलीहाऊस उभारणी केली त्यांनतर त्यामधे हिरवी काकडी पिकाची लागवड केली . पहिली वेळ असल्यामुळे अधिक माहिती नसल्यामुळे कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक , यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले त्यामुळे काकडी पिकाचे चांगले उत्पन्न आले व त्यानंतर हिरवी ढोबळी मिरची लागवड केली त्यापासुन खालील प्रमाणे उत्पन्न मिळाले पॉलीहाऊस क्षेत्र – ०.२० हे पिक काकडी काकडी उत्पादन १५००० किलो मिळालेला सरासरी दर रु २० मिळालेले उत्पादन रक्कम रु .३००००० / उत्पादन खर्च – ९ ८००० / उत्पादन खर्च वजा जाता झालेला नफा – २०२००० / कालावधी – ३ महिने पॉलीहाऊस क्षेत्र ०.२० ह पिक – ढोबळी मिरची ढोबळी मिरची उत्पादन ९ ००० किलो मिळालेला सरासरी दर रु ५० मिळालेले उत्पादन रक्कम रु .४५०००० / उत्पादन खर्च १२५००० / उत्पादन खर्च वजा जाता झालेला नफा – ३२५००० / कालावधी – ७ महिने काकडी व ढोबळी मिरची पिकातुन एका वर्षात झालेला नफा रु ५२७००० असे त्यांनी सांगितले यशस्वी होण्यासाठी शेतीत वेळेनुसार बदल करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी बालाजी परदेशी यांनी सांगितले तसेच आम्ही कमीत कमी रासायनिक खतांचा व कीटक नाशकांचा वापर करत असून पूर्वी होणाऱ्या खर्चात कपात झाली असून पूर्वीपेक्षा फक्त 30 ते 40 टक्के खर्च हा आता होत असून पाणी देखील याला कमी लागते म्हणजेच कमी जागेत कमी पाण्यात व कमी खर्चात पॉलिहाऊसमधील शेती असा हा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले









