जळगाव शहर

झांबरे विद्यालयात डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 14 एप्रिल २०२२ । ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील इतिहास विभाग प्रमुख अतुल पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनातील प्रसंग तसेच संघर्ष योध्दा, संविधान शिल्पकार, शिक्षणतज्ञ, विचारवंत, तत्त्वज्ञान, समाजसुधारक, कलाप्रेमी, चित्रकार, अर्थ शास्त्री, इतिहासकार भारतरत्न ते विश्वरत्न कसे घडले याविषयी कथन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील व जगातील विविध विद्याापिठातून प्राप्त केलेल्या पदविका यांची माहिती दिली तसेच त्यांचा शिक्षणाविषयीचा विचार शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा समाजासमोर मांडला.
शाळेतील उपशिक्षक चंद्रकांत कोळी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्यावर केलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली व जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील आदर्श राज्यघटना कशी निर्माण केली गेली या विषयी माहिती दिली. याप्रसंगी डी.ए.पाटील, महेंद्र नेमाडे, बिपीन झोपे, सुनील बावस्कर, माधुरी भंगाळे, वर्षा राणे, मनिषा ठोसरे, सुचिता शिरसाठ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button