अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक

एप्रिल 14, 2022 2:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा गावात पोलिस पथकाने दोन गावठी दारू विक्रेते, तिघे सट्टा जुगार खेळवणारे अशा पाच जणांना अटक करण्यात आली.

avaid dharu 1

डोंगरकठोरा येथे अवैध गावठी दारू विक्री, सट्टा सुरू असलेल्याची माहिती यावलचे पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांना मिळाली. त्यांनी सहायक फौजदार असलमखान, सुशील घुगे, राहुल चौधरी, राजेश वाडे यांना कारवाईला पाठवले. या पथकाने संतोष भीमराव सपकाळे याचेकडून ७५० रुपये किंमतीची १५ लिटर गावठी दारू, सुभाष त्र्यंबक काळेकडून ४५० रुपये किमतीची नऊ लिटर दारू जप्त केली. दोघांना अटक करण्यात आली. बस स्टँड परिसरात सट्टा जुगार चालवणारे दिलीप पाटील याचेकडून ४३०, अशोक कोळी याचेकडून ६३० रुपये व अरविंद पाटील याचेकडून ७५० रोख रकमेसह साहित्य जप्त केले. आरोपींना अटक केली. तपास हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now