एरंडोल
एरंडोल येथे आजपासून भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । रब्बी हंगामातील ज्वारी, मका हे भरडधान्य हमीभावाने खरेदी करण्यासाठी आजपासून (दि.१३), एरंडोल शेतकरी सहकारी संघात ऑनलाइन नाव नोंदणी सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भरडधान्याला हमीभावाचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. नावनोंदणी करतांना २०२१/२२ या वर्षाचा ऑनलाइन रब्बी पिकपेरा लावण्यात आलेला सातबारा उतारा (सत्यप्रत), आधार कार्ड, बॅँक पासबुक झेरॉक्स अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याशिवाय ऑनलाईन नावनोंदणी होणार नाही. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष नीळकंठ पाटील, व्यवस्थापक अरूण पाटील यांनी केले आहे.