⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | पिंपळकोठा येथे विहिरीत तरंगताना आढळला १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह

पिंपळकोठा येथे विहिरीत तरंगताना आढळला १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बु. येथे एका १९ वर्षीय तरुणीचा शेतातील विहिरीत तरंगताना मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लक्ष्मी दिपक मोरे असे मृत तरुणीचे नाव आहे. 

लक्ष्मी मोरे या तरुणीचा मृतदेह गावाशेजारील नरसिंग दशरथ पाटील यांच्या शेतातील विहीरीच्या पाण्यात तरंगताना आढळून आले. मृतदेह विहीरीतुन काढून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत येथील पोलीस पाटील रविंद्र अमृत पाटील यांच्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला १५/२०२१ सी.आर.पी.सी .१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढिल तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महेन्द्र पाटील करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.