जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । भाजपने काढलेला जन आक्रोश मोर्चा हा केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात का काढला जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचा हा मोर्चा म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. एकनाथ खडसे यांच्या या टिकेवरही गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला.

गिरीश महाजन म्हणाले, महागाईविरोधात आघाडी सरकारने आंदोलन करून पाहावे, किती लोक येतात ते त्यांना कळेल. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातही होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.”









