⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ‘या’ तारखेला जळगाव शहरातील जी एस ग्राउंडवर येणार शरद पवार

‘या’ तारखेला जळगाव शहरातील जी एस ग्राउंडवर येणार शरद पवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । शेतकरी कुटुंबातील महिला ही खरी शेतीचा कणा आहे कारण सर्वात जास्त श्रम तीच करत असते आणि अशी ही शेतकरी महिला जिने शेतीचा शोध लावला ती आता पुन्हा एकदा शेतीत जी आज दुरवस्था आहे ती दूर करण्यासाठी व समृद्ध शेतीचा संकल्प करण्यासाठी 15 एप्रिल ला मोठ्या संख्येने प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र येते आहे आणि केवळ शेतकरी महिलाच नाही तर शहरी भागातील मोलमजुरी करणारी कष्टकरी महिला असेल अल्पसंख्यांक बेरोजगार महिला असेल कोरोना मध्ये जिने आपला पती गमावला अश्या एकल महिला असतील अश्या सर्व महिलांची ताकद 15 तारखेला आपलं जीवन समृद्ध करण्याचा निर्धार घेऊन एकत्र येणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेंसार्वा शरद पवार जी एस ग्राउंडवर येणार आहेत.

लोकसंघर्ष मोर्चा ग्रामीण व आदिवासी ,अल्पसंख्याक, शेतकरी ,शेतमजूर क्षेत्रात गेली 25 वर्षे कार्यरत आहे यात संघटनेचा भर हा ग्रामीण व अदिवासी क्षेत्रातील नैसर्गिक संसाधने व त्यावरचा लोकांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठीचा राहिला आहे एक प्रदीर्घ संघर्ष लोकशाही व अहिंसक मार्गाने संघटनेने यशस्वी करून दाखवला आहे.

आदिवासींना पिढ्यानपिढ्या नाकारलेले त्यांचे जल जंगल जमीनी वरचे अधिकार मिळवून देण्यात संघटनेची महत्वाची भूमिका राहिली आहे त्याच बरोबर ग्रामीण व बहुजन शेतकऱ्यांचे प्रश्न ही संघटनेने सातत्याने मांडले आहेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप असेल किंवा दिल्लीत शेतकऱ्यांच्या विरोधात संसदेने पारित केलेल्या 3 काळ्या कायद्यांच्या विरोधातली लढाई असेल लोकसंघर्ष मोर्चा ने यात सहभागी होत शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सतत आंदोलने केली आहेत मात्र एकीकडे केवळ संघर्ष च न करता ग्रामीण विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना न्याय मिळावा व त्यांची शेती कशी समृद्ध होईल या साठीही विधायक व रचनात्मक कार्यक्रमांवर भर देण्याचा व त्यासाठी लोकांना सक्षम बनवण्याचा ही संघटनेने प्रयत्न केला आहे दि 15 एप्रिल रोजी होणारी समृद्ध महिला संकल्प परिषद असेच एक रचनात्मक पाऊल आहे जे अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.



author avatar
टीम जळगाव लाईव्ह