खा.शरद पवार १५ रोजी जिल्हा दाैऱ्यावर

एप्रिल 11, 2022 5:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे १५ एप्रिल राेजी एक दिवसाच्या जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. चांदसर (ता.धरणगाव) येथे माजी आमदार स्वर्गीय मुरलीधर पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार

१५ एप्रिल राेजी चांदसर येथे सकाळी ८ वाजता पुतळा अनावरण खासदार शरद पवारांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दतात्रय भरणे, ऊर्जा व उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जैन उद्याेग समुहाचे अध्यक्ष अशाेक जैन यांच्यासह अन्य पदाधिकारी, अामदार, खासदार, माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. जिल्हाभरातील सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, चांदसरचे सरपंच सचिन पवार यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now