⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | एरंडोल येथे रामनवमी उत्सव थाटात साजरा

एरंडोल येथे रामनवमी उत्सव थाटात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । एरंडोल येथे परदेशी गल्ली मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती . विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले . शहरातील श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात रविवारी साजरा करण्यात आला . दुपारी १२ वाजता दरम्यान मोठ्या पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून भक्तांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा झाला .


सकाळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक अभिजित दुबे यांनी केले. यानंतर आरती व श्रीरामाच्या नावाचा जयघोष व गजर करण्यात आला . प्रसादाचेही वाटप करण्यात आले . अन्य ठिकाणच्या श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला . मंदिरात राजेश दुबे व दिनेश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पांडे, जितेंद्र नाईकयांनी पुजा अर्चना केली . राम जन्मोत्सवाच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . रामनामाचा जयघोष आरती , भजने म्हणण्यात आली . प्रसादाचे वाटप करण्यात आले.

सर्वच मंदिरामध्ये भाविकभक्तांची मोठी गर्दी उसळली होती . महिला भक्तांची गर्दी होती. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, मनिष ठाकुर, शेखर बुंदेले, विवेक ठाकुर, नितिन तोतला, सुनील पल्लीवाल, कुंदन सिंह ठाकुर, आरती ठाकुर, अर्चना दुबे,जया दुबे ,रविंद्र निंबाळकर, छाया निंबाळकर हितेंद्र परदेशी , कौतिक पाटील, नीता तिवारी, कविता मानुधने , किर्ती पांडे, आदित्य दुबे ,अक्षदा दुबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह