⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | ५० हजार भाविकांनी घेतले मनुदेवीचे दर्शन

५० हजार भाविकांनी घेतले मनुदेवीचे दर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । सातपुडा निवासिनी मनुदेवीच्या मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. शनिवारी या चैत्र नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमी होती. त्यात शनिवार हा सुटीचा दिवस असल्याने सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यात अनेकांनी सातपुड्यात सहलीसोबत दर्शनाचा आनंद घेतला.


मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या उत्सवातील दुर्गाष्टमीला महत्त्व असते. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे शनिवारी सुटीचा दिवस असल्याने गर्दीत वाढ झाली होती. त्यासाठी सकाळपासूनच मंदिर संस्थानने दर्शनबारीची व्यवस्था केली. यापूर्वी कोरोनाच्या दोन वर्षांत सण-उत्सवांवर बंदी होती. त्यामुळे मनुदेवीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी अष्टमीला प्रचंड गर्दी असूनही शांततेत पूजाविधींसह दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक आर.के.पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील यांनी उत्सवासाठी परिश्रम घेतले. तर यावलचे पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार अजित शेख, गणेश ढाकणे, शामकांत धनगर, होमगार्ड संजय साळुंखे, सीताराम बारेला, इकबाल तडवी यांनी बंदोबस्त ठेवला. यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था… अष्टमीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी डॉ.पिंगळे व किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने दोन आरोग्य पथक तैनात ठेवले होते. शिवाय तापमान चाळिशीपार ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली होती.
वर्षांत सण-उत्सवांवर बंदी होती. त्यामुळे मनुदेवीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी अष्टमीला प्रचंड गर्दी असूनही शांततेत पूजाविधींसह दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक आर.के.पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील यांनी उत्सवासाठी परिश्रम घेतले. तर यावलचे पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार अजित शेख, गणेश ढाकणे, शामकांत धनगर, होमगार्ड संजय साळुंखे, सीताराम बारेला, इकबाल तडवी यांनी बंदोबस्त ठेवला. यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह