जळगाव जिल्हा
जामनेर तालुक्याच्या विकासासाठी महाजांनी केले २३ काेटी मंजूर
जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । जलजिवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे तालुक्यातील २२ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे २३ कोटींच्या खर्चालाही मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जितू पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दीपक तायडे, ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते. तालुक्यातील खडकी योजनेसाठी ३ कोटी ४७ लाख, मालखेडा ९० लाख ७३ हजार, पळासखेडा बुद्रुक ४८ लाख ८० हजार, गंगापुरी २३ लाख, मोयगाव बुद्रुक १ कोटी १० लाख, टिघ्रे वडगाव ६० लाख ७१ हजार, किन्ही १ कोटी ३३ लाख, वाडी २७ लाख, टाकरखेडा ३८ लाख, ढालगाव ७१ लाख, शहापूर १ कोटी ३० लाख, एकुलती १ कोटी ४ लाख, नेरीदिगर २ कोटी ६० लाख, रांजणी १ कोटी ९८ लाख, जांभुळ ४५ लाख, बोरगाव ७८ लाख, गारखेडा बुद्रुक १ कोटी ५३ लाख, कापूसवाडी १ कोटी १४ लाख, वडगाव सद्दो २९ लाख, पठाडतांडा १ कोटी ४० लाख, टाकळीपिंप्र ५६ लाख ७४ हजार तर गोद्री गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी २४ लाख असा २३ कोटींचा खर्च हाेणार आहे. |