जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । पूर्वी आपल्या देशाकडे जग दयेच्या भावनेने पाहत होते; परंतु आता माहिती-तंत्रज्ञान,विज्ञान या क्षेत्रात परिश्रमपूर्वक केलेली प्रगती पाहता जगात सर्वत्र भारताची प्रशंसा होत आहे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व नूतन मराठा महाविद्यालयातर्फे शनिवारी विद्यापीठात एकदिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील शिक्षण तज्ज्ञ प्रा.डॉ. एम.डी. जहागीरदार, आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सुजाता सिंघी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, परिषदेचे संयोजक प्रा. डॉ. अविनाश बडगुजर, आयोजन समिती सचिव प्रा. भागवत पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा. डॉ.एस. ए. गायकवाड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुजाता सिंघी यांनी संगीत मनःशांतीसाठी सर्जनशीलता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. परिषदेला प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, प्रा. डॉ. इंदिरा पाटील, प्रा. नितीन बाविस्कर, प्रा. सतीश पडलवार, प्रा. डॉ. राहुल संदांशिव, प्रा.आर.जी. पाटील, प्रा. डॉ. माधुरी पाटील यांचे सहकार्य लाभले. परिषदेत एकूण २३० संशोधन निबंध ४५० सहभाग नोंदणी झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते शोध निबंधांच्या चार खंडांचे विमोचन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे डॉ. अजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कांचन धांडे यांनी अाभार मानले.
प्रथम तांत्रिक सत्राचे वक्ते डॉ. एम. डी. जहागीरदार यांनी नवीन शैक्षणिक धोरण व नॅक मूल्यांकनासंदर्भात महाविद्यालय व विद्यापीठे यांनी गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. द्वितीय सत्रात प्रा. डॉ. माया इंगळे यांनी जगाच्या जडणघडणीमध्ये तांत्रिक प्रवाहाचा प्रभाव या विषयावर मांडणी केली. तिसऱ्या तांत्रिक सत्रात डॉ. पी. एस. कुलकर्णी यांनी पाणी समस्या यावर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन या विषयावर विवेचन केले. त्यात त्यांनी पाणी आज काल आणि उद्या यावर भर दिला. चौथ्या तांत्रिक सत्रात शेंदुर्णी येथील प्रा. डॉ. श्याम साळुंखे यांनी वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रातील बदलते प्रवाह या विषयावर प्रतिपादन केले. समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी. इंगळे उपस्थित होते. प्रा. भागवत पाटील यांनी आभार मानले.
अांतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.व्ही. एल. माहेश्वरी.