जळगावत दुचाकी चोरी सत्र थांबेना : एकाची दुचाकी लांबविली

एप्रिल 10, 2022 4:27 PM

crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । जळगावत दुचाकी चोरी सत्र थांबता थांबत नाहीये. स्वातंत्र्य चौकातून २० हजार रूपये किंमतीचा एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विलास मधुकर चौधरी (वय-५५) रा. डोंगर कठोरा त. यावल जि.जळगाव हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ते दुचाकी (एमएच १९ सीएच ५७८९) ने जळगावात आले होते. शहरातील स्वातंत्र्य चौकातील बाल न्यायालयाच्या समोर गेट जवळ दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कोठेही आढळून आली नाही.

शनिवारी ९ एप्रिल रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापुराव बडगुजर करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now