जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । शहरातील आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या कामाचा ठराव मंजूर केल्यानंतरही प्रशासनाकडून अद्यापही या प्रकल्पाच्या कामाला अजूनही मक्तेदाराला कार्यादेश दिला गेलेला नाही. यामुळे मनपाला पुन्हा सर्वेक्षणात ३ स्टार मिळणे कठीण असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गंत केंद्राच्या समितीकडून शहरातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात अली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता दोन वेगवेगळे पथक शहरात दाखल झाले. यात एका तीन सदस्य असलेल्या समितीकडून शहरातील विविध भागातील साफसफाईची तपासणी केली तर दुसऱ्या २ सदस्य असलेल्या समितीकडून शहरातील शौचालयांची तपासणी केली. दोन दिवस तपासणी केल्यानंतर समितीकडून गोपनीय अहवाल केंद्र शासनाकडे पाठविला आहे.मात्र मनपाला प्रशासना कडून निधी मिळाला असूनही घनकचरा प्रकल्पाच्या कामाला कार्यादेश दिलेला नाहीये. यावर या समितीने तीव्र नाराजी दर्शवली.

एकीकडे भाजपच्या विरोधानंतर हा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे थांबलेल्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, मनपा प्रशासनाकडून ठराव होवून इतके दिवस झाल्यानंतर देखील अद्यापही संबधित मक्तेदाराला काम सुरु करण्यासाठी कार्यादेश देण्यात आले नाहीत. यामुळे आलेली समिती यावर खूप नाराज झाली असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे.








