जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । बांधकाम परवानगी घेताना पार्किंगची जागा दाखवली; परंतु प्रत्यक्षात व्यावसायिक वापर सुरू असल्याचे असलेल्या शहरातील २८ प्रतिष्ठानांना मनपाने दणका दिला आहे. नेहरू चाैक ते टाॅवर चाैक दरम्यानच्या २८ व्यावसायिक प्रतिष्ठानांना सकारण अादेश बजावले जात आहेत. सर्वेक्षणादरम्यान वापर चुकीचा असल्याने सर्व दुकानांना सील ठाेकले जाणार असून साेमवारनंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू हाेईल.
महापालिका क्षेत्रात पार्किंगची समस्या डाेके वर काढत आहे. प्रमुख वर्दळीच्या एकाही रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नाही. जी व्यापारी संकुले व दुकानांसमाेर वाहने उभी दिसतात त्या दुकानांच्या बेसमेंटमधील पार्किंग केवळ कागदावर आहेत. प्रत्यक्षात व्यावसायिक वापर करून पैसे कमावले जाताहेत. त्याचा परिणाम रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असून वाहतुकीचा खाेळंबा हाेताे आहे. या संदर्भात दाेन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले हाेते. त्यात ३० पैकी २८ ठिकाणी पार्किंगची जागा आर्थिक कमाईसाठी गिळंकृत केल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रतिष्ठानांची सुनावणी हाेऊन त्यांच्यावर कारवाईसाठी सकारण आदेश बजावले जाताहेत. गाेदामाऐवजी दुकाने उघडली, तसेच पार्किंग ऐवजी दुकाने अथवा गाेदामासाठी वापर सुरू असलेल्या प्रतिष्ठनांना सील करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले आहे.
यांचावर होणार कारवाई
जळगाव जनता सहकारी बँक, लिलम ड्रायफूट, प्रितम शूज, लुईस फिलिफ, रायसोनी किड्स, कार्पोरेशन बँक, ब्लॅक बेरी शो रूम, पिटर इंग्लंड, अाहुजा डिजिटल फोटो लॅब, नटवर थिएटर मॉल, नटवर मल्टिप्लेक्स, सेलिब्रेशन मॉल, दीपक शूज, प्राप्ती गारमेंट्स, श्रीराम प्लाझा, शहा ऑर्किड, पंजाबी मन्नत शूज, नीलेश फुटवेअर, खान्देश स्पोर्ट््स, बाटा शो रूम, नॅशनल स्टोअर अाणि शीतल कलेक्शन यांना अादेश बजावून लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात अाले.