एन. मुक्ता संघटनेच्या केंद्रीय कार्यालय फलकाचा उद्घाटन सोहळा

एप्रिल 9, 2022 3:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। ९ एप्रिल २०२२ । नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एन मुक्ता) या प्राध्यापक संघटनेच्या केंद्रीय कार्यालयाचे फलक अनावरण आणि कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे १० एप्रिल रविवारी रोजी शिवकॉलनी येथे सकाळी १०.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

sohala jpg webp

शिवकॉलनी येथे सकाळी १०.०० वा. एन मुक्ताच्या केंद्रीय कार्यालयाचे फलक अनावरण व कार्यालयाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी संघटनेच्या फलकाचे अनावरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार स्मिताताई वाघ व कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य अधिसभा सदस्य आणि विद्या परिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींणी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन एन. मुक्ता संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. नितीन बारी यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now